Thursday, February 11, 2010

मला कळत नाही



सत्य कळत नाही, मला सत्व कळत नाही
हे रुपेरी जगा मला तुझे रंग कळत नाहीत
देशासाठी स्वतःचे, व स्वहिता साठी देश-बांधवांचे
रक्त वहावणारे दोघे ही, राजनेता कसे?
मला कळत नाही
दोस्तासाठी जीव देतात तेच खरे दोस्त
पण स्पर्धेसाठी , दोस्ता चा गळा कापणारे दोस्त!
मला कळत नाही
कळतात मला एकमेकांचे होण्याची इच्छा बाळगणारे प्रेमी; पण, एकमेकांना , नेहेमीसाठी विसरणारे प्रेमी!
मला कळत नाही
गोजिरवाण्या कन्यारत्नाचे खरे तर लाड़ करते आई
पण उमलताक्षणी, त्या कळीला कुसकरणारी आई!
मला कळत नाही
खरे त्तर दुःख स्वजनांचे आणतात डोळ्यात अश्रु,
पण त्यांच्या आनंदात ही का येतात हर्षाश्रु!
मला कळत नाही

No comments:

Post a Comment