Friday, February 12, 2010

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
पण आपले एक मेकान वरचे प्रेम same नसतं

बापाचे ही स्वतःच्या मुला वर प्रेम असतं
पण  आईचे मुला वरचे प्रेम हे श्रेष्ठ असतं

भावाचे ही त्याच्या बहिणी वर प्रेम असतं
पण ताईचे लहान भावावरचे प्रेम और च असतं

तसे तर आपले सर्व मित्र / मैत्रिणी वर प्रेम असतं
पण गर्ल फ्रेंड /बॉय फ्रेंड वर वेगळ च प्रेम असतं

नवरा आणि बयकों ह्यांचे एक मेकांवर प्रेम असतं
पण प्रथम व्यक्त केलेले प्रेम आठवणीतलं  असतं

माणसाने माणूस जाती वर कलेले प्रेम हे उत्तम असतं
पण देवाचे आपल्या सर्वांवर असलेले प्रेम सर्वोत्तम असतं

Thursday, February 11, 2010

सोनू

आमची सोनू 
गोरीगोरी पान
नवनवीन कपड्यात
दिसते छान।
सोनू जवळ आहेत
बाहुली नि बाहुला
विमान, मोटर, गाड़ी
सारे तिला हवी
असतात खेळायला
रोज नवीन फ्रोक
तिला हवा असतो घालायला
आज पिंक  सोनू  तर
उद्या ब्लू सोनू 
म्हणा म्हणते मला।
सोनू चा असा
असतो थाट
बसायला हवा असतो तिला
आई बाबां च्या मांडी चा पाट
बाबांशी कधी
गट्टी फू करते
आईला ही बाबांशी
बोलू नको म्हणते
अशी ही  सोनू 
अवखळ भारी
सर्वांची आवडती
घरी अन दारी।
आमची सोनू 
फार गोड
तिला खड़ी साखर
म्हणू की संत्र्या ची फोड़

खेर

'त' ळयात मळयात गाणे गाता
'न' भात गिरकी घेऊ
'वी' रांगनांच्या कथा वाचता
'खे' ळात दंगुनि जाऊ
'र' सरंगांचा कोष विणता
'दीप्ती' मांजी न्हाऊ
'तुषार' थेंबे रोमाचिंता
'गाथा' सह नाचू गाऊ !!!!!!

सांग तू माझी होशील का?

सांग तू माझी होशील का?
माझी होऊन माझ्यावरती
प्रेमवर्षा करशील का?
सांग तू माझी होशील का?

मला दीसणार्या स्वप्नातली
स्वप्नसुंदरी तू होशील का?

पहाटेस माझ्यावर पडणारे
प्रथम सूर्यकिरण तू होशील का?

सप्तसूरात तू गात असताना
होईन तुझा स्वर मी,
अश्रू तुझे पुसणारा
रेशमी रुमाल होईन मी,
आनंदात तुझ्या ओठावरचे स्मित होईन मी,
दुःखात तुझ्या जखमांवर मलम लाविन मी,
आयुष्यभर पुरणारा तुझा खरा मित्र होईन मी,
एकांतात तुझा मनाचा विरंगुळा होईन मी,

पण सांग एकदा तू
माझ्या मनाची राणी
खरच तू माझी होशील का?

मला कळत नाही



सत्य कळत नाही, मला सत्व कळत नाही
हे रुपेरी जगा मला तुझे रंग कळत नाहीत
देशासाठी स्वतःचे, व स्वहिता साठी देश-बांधवांचे
रक्त वहावणारे दोघे ही, राजनेता कसे?
मला कळत नाही
दोस्तासाठी जीव देतात तेच खरे दोस्त
पण स्पर्धेसाठी , दोस्ता चा गळा कापणारे दोस्त!
मला कळत नाही
कळतात मला एकमेकांचे होण्याची इच्छा बाळगणारे प्रेमी; पण, एकमेकांना , नेहेमीसाठी विसरणारे प्रेमी!
मला कळत नाही
गोजिरवाण्या कन्यारत्नाचे खरे तर लाड़ करते आई
पण उमलताक्षणी, त्या कळीला कुसकरणारी आई!
मला कळत नाही
खरे त्तर दुःख स्वजनांचे आणतात डोळ्यात अश्रु,
पण त्यांच्या आनंदात ही का येतात हर्षाश्रु!
मला कळत नाही

गणराया ची कृपा

जेव्हा जसे सुचले, तेव्हा तसे लिहिले
गणरायाच्या कृपेने त्याचेच काव्य झाले

चार शब्द इकडून तिकडून गोळा करून मांडले
मोरया तुझी मेहेरबानी, ते लेख म्हणून खपले

चार वेड्यावाकड्या रेघा मी इकडे तिकडे काढल्या
कृपा गणपती तुझी, त्या ही चित्रात जमा जाहल्या

आवाजाची चढ़उतर निव्वळ हातवारे
गणेशा कृपा तुझी, त्याचे ही नाट्य व्हावे

विचार करता आज वर स्वछन्दपणे मी वागलो
सुखकर्ता तुझ्या कृपेने आजवर सुखी राहिलो

प्रार्थना तुझ्या चरणी एवढी, कृपाछ्त्र तुझे मज नेहेमी लाभावे
राहिलेले आयुष्य ही माझे, तू आनंद उत्साहात घालवावे

मित्र

जेव्हा त्याला नेटवर भेटते
माझ्या मनी उर्मी भरते
त्याने पाठवलेल्या "स्माइली"
माझ्या चेहेरी हसू आणते

त्याचे ते प्रेमळ बोलणे,
मधूनच विनोद करणे,
सांगायचे जे असते ते
सहजगत्या मांडणे,

मनाला माझ्या भिडून गेले,
त्याचे ते लाडिक वागणे।
कधी एकदा त्याला भेटते
अशी सारखी ईच्छा होते.